08 May 2010

प्रदुषण ग्रस्त श्री दत्तक्षेत्र नॄसिंहवाडी.(नरसोबाचीवाडी)


नरसोबाचीवाडी.


श्री.विष्णुपंत रा. कुलकर्णी यांच्या घरातील मंदीर्.औरवाड (संदर्भ:--- गुरुचरित्र १८ वा अध्याय. घेवड्याचा वेल उपटला)
यांची ११ पिढी सध्या कार्यरत असुन या घटनेस ७००+ वर्ष झाली आहेत.

श्री.विष्णुपंत रा. कुलकर्णी यांच्या घरातील मंदीर्.औरवाड.

श्री.विष्णुपंत रा. कुलकर्णी यांच्या घरातील मंदीर्.औरवाड.

श्रीं ची उत्सव मूर्ती नॄसिंहवाडी.(नरसोबाचीवाडी)

श्री दत्त मंदीर कॄष्णावेणी घाट, नॄसिंहवाडी.(नरसोबाचीवाडी)

वाडी गावातील सांडपाणी सरळ नदीत सोडले जाते जे वरच्या घाटात जिथे लोक अंघोळ करतात तिथे पोहचते.

हे दुसरे गटार...याचे पाणी सुद्धा नदीत जाते.

सतत वाहणारे गटाराचे पाणी जे कॄष्णा नदीत जाते ज्याच्यात भाविक अंघोळ करतात...

घाटा पासुन या सांड पाण्याचे अंतर फक्त काही फुटच आहे.


कृष्णावेणी आणि पंचगंगा संगमाच्या पवित्र पुण्य भूमिच्या परिसरात वसलेले हे क्षेत्र म्हणजे नरसोबाचीवाडी.या क्षेत्री वर्षभर भक्तमंडळी महाराष्ट्रातुन, देशातुन तसेच परदेशातुनही इथे येतात्.येथे शनिवार हा महत्वाचा दिवस मानला जातो...प्रत्येक पोर्णिमेला इथे येणार्‍या वारकरी लोकांची संख्या देखील पुष्कळ असते.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे मी गेले जवळपास २५ वर्षांहुन जास्त काळ जात आहे.परंतु या वेळी या ठिकाणी भेट दिल्यावर मला धक्कादायक दॄष्य पहावयास मिळाले. वाडी गावातले सर्व सांडपाणी हे कुठल्याही प्रकारचे शुद्धीकरण न-करता सरळ नदीत सोडले जाते...मला माहित आहे की हिंदुस्थानातल्या सर्व नद्यांची हीच अवस्था झाली असुन लोकांनी नद्यांचे सांडपाण्याचे नाले करुन टाकले आहेत. या दत्तक्षेत्री अनेक भाविक मंडळी येतात व ते सर्व इथल्या नदीवर बांधलेल्या घाटावर स्नान,संध्या आणि इतर धार्मीक विधी करतात...तसेच याच घाटातल्या नदीचे पाणी देवावर केल्या जाणार्‍या विविध उपचारांमधे वापरले जाते.आता गावातलेच सर्व घाण पाणी गटारातून सरळ नदीत सोडल्याने ते सर्व घाणपाणी या ठिकाणी पोहचत आहे...त्याच पाण्यात सर्व लोक अंघोळ देखील करत आहेत. ज्या पाण्यात आता मला पोहायला देखील किळस वाटते तेच पाणी देवकार्यासाठी वापरले जात आहे हे पाहुन मनाला प्रचंड त्रास झाला.इथल्या ग्रामस्थांनी अनेकवेळा तक्रार करुन देखील... आहे त्या परिस्थितीत काहीही फरक पडला नसुन ग्रामपंचायत या सर्व बाबतीत उदासिन असल्याचे कळते.

दत्त देव अत्यंत कडक असल्याने त्यांना अपवित्रपणा अजिबात चालत नाही,म्हणुन वर्षातून एकदिवस "संप्रोक्षण" नावाचा धर्मशास्त्राने सांगितलेला विधी यथे केला जातो...परंतु हा पाहण्यात आलेला प्रकार (गटाराचे पाणी देवाला वापरले जाते) तर अत्यंत किळसवाणा असुन या बद्धल कोणालाच कसे काही वाटत नाही ?

हा सर्व प्रकार इतर दत्त भक्तांना देखील कळावा, म्हणुन हा लेख लिहण्याचा प्रपंच करत आहे.


मदनबाण.....

05 May 2010

कृष्णेंद्रनावः---कृष्णेंद्र नारायण वाडीकर.

वयः--- ३०

निवास स्थानः--- हुबळी आणि नृसिंहवाडी(नरसोबाचीवाडी)

संपर्क क्रमांक :--- ०८३६२३०५६७३ व ०९५३८४६५५२

कृष्णेंद्र यांचे गायकीचे शिक्षण पं.अर्जुनसा नाकोड (ग्वालीयर घराणे) तसेच पं.श्रीपती पाडीगार (किराणा घराणे...भारत रत्न पं.भिमसेनजी जोशी यांचे शिष्य) यांच्याकडे झालेले आहे.

पुर्वी कृष्णेंद्र हंम्पी युनिव्हर्सिटी मधे लेक्चरर होते पण आता ते पूर्णवेळ गायक म्हणुन कार्यरत आहेत.

मल्हार उत्सव २००६ आणि सवाई गंधर्व २००८ मधे यांचे गायन झाले असुन नॅशनल लेव्हल स्पर्धा हैद्राबाद (२००६)मधे हे प्रथम क्रमांकानी विजयी झाले होते.

कृष्णेंद्र यांना यंग टॅलेंटेड सिंगर्स ऑफ इंडिया चा पुरस्कार मिळाला असुन रु.५०००० आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

आकाशवाणी सांगली व पणजी येथे ते सध्या गात असुन वर्ल्ड स्पेस रेडियो तसेच लास्ट एफएम यावर देखील त्यांची गाणी प्रसारित होत आहेत.

कृष्णेंद्र यांची आणि माझी ओळख दोन दिवसापुर्वीच श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे झाली...देवाच्या पालखी समोर त्यांनी सादर केलेले गाणे ऐकुन मी मंत्रमुग्ध झालो आणि हे गायक नक्की आहेत तरी कोण याचा शोध घेतल्यावर यांची भेट झाली...त्यांच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या तसेच त्यांच्या मैफिलीचा आनंदही लुटता आला....

वरील व्हिडीयो हा माझ्या साध्या डिजीटल कॅमेराने चित्रीत केला असल्यामुळे त्याचा दर्जा म्हणवा तेव्हढा उत्तम नाही...(रियाजाच्या वेळी मी हा व्हिडीयो चित्रीत केलेला आहे.)तरी सुद्धा हेही नसे थोडके म्हणुन हा व्हिडीयो इथे देत आहे.यासाठी कृष्णेंद्र यांची परवानगी घेतलेली आहे.
कॄष्णेंद्र यांनी गायलेली काही गाणी तुम्हाला पुढील दुव्यावर मिळतील...

http://www.esnips.com/web/krishnendrawadiakrclassicalvocal

श्री. कृष्णेंद्र यांच्या पुढील वाटचालीस माझ्या हार्दिक शुभेच्छा...