24 September 2009

|| श्री महालक्ष्मी ||

या वर्षी माझ्या घरी असलेल्या नवरात्रातील देवीचे फोटो.(२१ सप्टें २००९)


परंपरेने चालत आलेली अंगुष्ठमात्र देवीची मूर्ती. (आकार फारच लहान असल्याने देवी फोटोत स्पष्ट दिसत नाही.)


यज्ञाच्या निमित्त्याने गुरुजींनी सजवलेली दुसरी देवी.


देवीची सजावट सुरु झाली. देवीला नटवण्याची मजा काही औरच !!! :)


देवी पूर्ण नटल्यावर...


कशी दिसतेय...:) गुरुजींनी फारच छान आरास केली.


जगदंब उदयोस्तु...


मदनबाण.....

|| जय गजानन ||

माझ्या कॉलनीतील सर्व सार्वजनिक मंडळातल्या गणपतींचे व मित्र परिवारातील तसेच मंदीरातील गणेशाची प्रतिमा टिपल्या आहेत. (२१ सप्टें २००९)


माझ्या सोसायटीतला गणपती. :)


माझ्या मामाकडचा गणपती. :)


दिड दिवसाचे गणपती जाणार असल्याने बॅन्जो पार्टी जोशात आहे.

या वर्षी पाऊस जास्त न झाल्याने देशात दुश्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्यामुळेच बळीराजा अत्यंत त्रस्त झालेला आहे....या आपल्या शेतकर्‍याला चांगले दिवस दिसावेत आणि देशात / परदेशात रहाणारे हिंदुस्थानी लोक सदैव आनंदी आनंदात रहावे हीच श्री गजाननाच्या चरणी प्रार्थना करतो.

आपलाच...
(हौशी फोटुग्राफर)
मदनबाण.....

05 September 2009

माझी धडपड... भाग ९

काही तरी नवीन करतोय याचाच जास्त आनंद मला झाला होता.
पण मला माझा सहकारी जसा वाटला होता त्यापेक्षा तो जरा निराळाच होता...
*****************************************************************
या नवीन साईटवर आल्यापासून मला जाणवले होते की माझा सहकारी बर्‍याच वेळा माझ्या बरोबर लोकेशनवर जाताना अस्वस्थ असे पण तसे होण्याचे काय कारण होते ते कळेना !!! जवळपास २ वर्षापासून तो या साईटवर काम करत होता आणि राहण्यास कल्याणालाच होता त्यामुळे त्याला जाण्यायेण्याचा काहीच त्रास नव्हता...
बर्‍याचवेळा तो मला कॉलवर नेण्यास उत्सुक नसे पण मी काहीही झालं तरी तुझ्याबरोबर येणार असे म्हंटल्यावर त्याचा नाईलाज होत असे.शेवटी एक दिवस त्याने मला एक गोष्ट सांगितली की जेव्हा तो कॉलवर जातो तेव्हा तिथल्याच काही कॉम्प्युटरचे भाग तो उचलतो म्हणजे काहीतरी झोल करून कधी मेमरी कधी प्रोसेसर तर कधी अख्खा मदरबोर्ड त्यांनी उचलुन घरी तेच सामान वापरून एक कॉम्प्युटर बनवला होता...
आयला हा तर पक्का झोलर निघाला...मी मनात विचार केला की तरीच हा अशा कॉल्सवर मला नेत नाही...त्याने मला त्याच्या या कामात सामील होण्यासाठी प्रयत्न केला...म्हणाला अरे इतकी घासून काय मिळणार आहे तुला...मस्त पैकी पी४ संगणक तयार होईल तुझा...फक्त काय मॉनिटर आणि थोड्या इतर गोष्टी विकत घ्याव्या लागतील...हार्डडिस्कचा पण पाहिजे तर जुगाड करतो...
क्षणभर मलाही वाटलं..व्वा मस्त कॉम्प्युटर बनेल..पण ही तर चोरी झाली आणि मला ते मान्य झाले नाही.मी त्याला म्हटलं मला काडीचा पण इंटरेस्ट नाही तुझ्या ह्या भानगडीत.हा नक्की कसं काय झोल झाल करत असेल याचा विचार मी करत बसलो कारण खराब झालेला पार्ट तर ऑफिसमध्ये सबमिट करावा लागत असे...जाऊदे...ज्या दिवशी पकडला जाईल तेव्हा ह्याच्या टाळक्यातला प्रोसेसर उडून बरोबर लेवल होईल असा विचार करून मी उगीच राहिलो.
त्याचा या सर्व कारभारात मी सामील होणार नाही याची त्याला खात्री पटल्याने व त्याचा हा सर्वझोलझाल मला समजल्याने तो अजून बिथरला...आता तू फक्त ऑफिसातले काम बघ मी बाहेरची कामे पाहीन असे त्याने मला सांगितले...मला हो म्हणण्या शिवाय दुसरा पर्यात त्याने ठेवलाच नव्हता !!! आता परत ९ ते ५ ऑफिसमध्ये नुसते बसून राहावे लागत होते..एखाध्या लिंकचा वगैरे प्रॉब्लेम झाला तर फक्त बिल्डिंग मध्ये वरखाली करायची संधी मिळे बाकी काम शून्य.
दिवसभर एसी हवेत बसून दिवसभर इंटरनेट इंटरनेट खेळण्याचा कंटाळा यायला लागला...एव्हढे पैसे भरून जर काही शिकायला मिळणार नसेल तर काय फायदा...शेवटी क्लासवाल्यांशी परत नडायचे ठरवले...नडल्याचा फायदा झाला आणि याच नामांकित कंपनीच्या नवी-मुंबईतील भव्य सेटअप मध्ये मला पाठवण्यात आले...नासा नंतर याच कंपनीचा सेटअप मध्ये नंबर लागतो असे ऐकले होते ते खरे का खोटे ते तिथेच गेल्यावर कळणार होते.
परत माझा इंटरव्ह्यू झाला आणि मी तो क्लियर झालो...नॉक= एनएनओसी (नॅशनल नेटवर्क ऑपरेटिंग सेंटर) एकदम भव्य सेटअप...मोठ्या मोठ्या मॉनिटरिंग स्क्रीन्स...देशभरात असलेल्या त्या कंपनीचे राऊटर्स एका मोठ्याश्या स्क्रीनवर दिसत होते...एकदम नासामधे आल्यासारखंच वाटलं...
व्वा !!! आपल्याला इथे काम करायची संधी मिळाली याचा फार आनंद वाटला...पण मी काही इथला युजर नव्हतो तर इकडच्या युजर्सना सपोर्ट करणारा एक सामान्य इंजि. होतो...काहीका होईना पण निदान असा ठिकाणी काही तरी नवीन शिकायला मिळेल याचा जास्त आनंद झाला होता.(फोटो जालावरून घेतले आहेत)
डोळ्यात हा सेटअप साठवून ठेवला... सुरुवातीचे काही दिवस या बिल्डिंग मध्येच गेले...नंतर दुसर्‍या बिल्डिंगमध्ये रवानगी झाली...मस्त पैकी केबिन आणि ड्युल १७ इंची एलसीडी मॉनिटर असा मस्त कॉम्प्युटर वापरायला मिळाला...इथल्या फ्लोअर खूपं मोठा होता...निरनिराळ्या प्रोजेक्ट्सची कामे तिथे चालू होती...जास्त करून टेलिकॉम रिलेटेड...तसेच डीटीएच चा प्रोजेक्ट सुद्धा चालू होता जो आता बाजारात उपलब्ध आहे...
लोटस नोट्स्,वेगवगळी सॉफ्टवेयर्स आणि बाकीचे सटरफटर काम असे मला करायचे होते...पण च्यामारी मला तर लोटस चा एल सुद्धा माहीत नव्हता तर त्याला सपोर्ट काय घंटा करणार...मागच्या बॅकेच्या साईटवर जसा एका टीम कडूनं हॅडओव्हर घेतला होता तसाच इथे सुद्धा तोच प्रकार होता...आणि ज्यांच्या बुडावर लाथ बसली होती त्यांच्या कंपनीचे इंजि. काहीही सरळ सांगण्यास तयार नव्हते....तरी सुद्धा येन केन प्रकारेण आम्ही सगळी माहिती मिळवलीच आणि मी आणि माझ्या बरोबर अजून ४ जण अशी टीम बनवली...मी टीमलीड म्हणून कामास सुरुवात केली...पहिला दीड महिना फार त्रासात गेला...पण हळू हळू सर्वकाही सुरळीत सुरू झाले...
एक दिवस त्या जुन्या साईटवरच्या मद्रासण पोरीचा मला फोन आला...नवर्‍याला दुबईत नोकरी असल्याने ती कोर्स सोडून जाणार होती...जाण्याच्या आधी तिला माझ्याशी बोलायचे होते...बराच वेळ बोलून अखेर तिने निरोप घेतला....
***
इथे काम करणार्‍या काही लोकांशी बोललो..ते नक्की कोणत्या स्वरूपाचे काम करतात आणि त्यासाठी त्यांनी काय शिक्षण घेतलं आणि कुठला स्पेशला कोर्स केला आहे त्याची माहिती मि़ळवण्यास सुरुवात केले..बरेच जण बी.इ इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅड टेलिकम्युनिकेशन वाले होते...आणि त्यातले काही कॉन्ट्रॅक्ट थ्रू कामास होते...जर यांची ही अवस्था आहे तर माझं कसं होणार ??? असा विचार मनात तरळून गेला...पण इथवर पोचलोय ना...तर यापुढेही मार्ग मिळेल असा विचार करून शांत झालो...
जितके तिकडचे मोठे साहेब लोक होते त्यांना गाठून माझा सिव्ही त्यांच्या कडे देऊन ठेवला...कोण जाणे कधी कुठला मटका कुठे लागायचा ते !!!
आता लोटस पासून जावापर्यंत आणि हार्डडिस्क फॉरमॅट पासून रजिस्ट्री एडिटींग पर्यंत बर्‍याच गोष्टीत हात एकदम सफाईदारपणे चालाला लागला होता...
एकदाच असेच एका मॅनेजरकडे गेलो होते त्याचं काहीतरी काम होत,,,त्याच्या डेस्कवर स्वामी विवेकानंदांचे काही कोट्स लिहिलेले होते मी ते वाचले आणि मला एक वेगळीच मजा वाटली...आत्ता पर्यंत स्वामी विवेकानंद म्हणजे फक्त भगवा वस्त्रधारी व्यक्ती या पलीकडे माझ्या टाळक्यात काहीच नव्हतं पण यांच्याविषयी वाचायला हवं असं त्यावेळेस कुठेतरी मनात वाटलं हे मात्र खरं...
त्या मॅनेजरला विचारले की जर तुमची परवानगी असेल तर मला याचे एक प्रिंटआऊट हवे आहे...घेऊ का ??? त्याने आनंदाने मला होकार दिला...आजही ती प्रिंटआऊट कॉपी माझ्या घरी एका ठिकाणी लावलेली आहे...असो..
अशीच वेगवेगळी लोक भेटत गेली आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल वेगवेगळी माहिती मिळत गेली....
काम नेहमी प्रमाणेच सुरू होते आणि त्यात काही वेगळेपण आता शिल्लक उरले नव्हते...माझ्या कोर्सचा हा ऑनजॉब ट्रेनिंगचा भाग काही दिवसात संपणार होता...आता पुढे काय करायचे हा विचार सुरू झाला...

ताक :--- काही दिवसापूर्वीच आत्ता ज्या कंपनीत मी काम करतोय...त्यांनी सेट्रीक्स या विषयावर (http://www.citrix.com/lang/English/home.asp) ट्रेनिंग ठेवले होते...त्या ट्रनिंग मध्येच मला एक मुलगी दिसली...हिला कुठेतरी पाहिले आहे असे वाटले...पण जाऊदे असा विचार करून गप्प झालो..पण तिने माझ्या एका मित्राकडे माझ्या बद्दल चौकशी करून मी आधी या या साईटवर कामाला होतो का अशी चौकशी केली...नंतर आमचं बोलणं झाल्यानंतर माझ्या टाळक्यातली ट्यूब पेटली आणि आठवले की...मी त्या सटक मॅनजरच्या इथे असताना या मुलीला एक-दोनदा मदत केली होती...म्हणजे मी त्या साईटवरून निघण्याच्या आधी दोन-चार दिवसच ती तिथे आली होती... बहुधा जवळ जवळ ३ एक वर्षांनी भेटलो असू... :) तसेच अजून एक मित्र देखील भेटला जो माझ्या बरोबर वरच्या कंपनीत कामास होता.... दुनिया गोल है | :)

क्रमशः

मदनबाण.....