17 April 2009

४० लाखांची साडी
How often have you come across a Rs. 40 lakh ($100,000)silk saree?

Chennai Silks, a textile unit has come up with one
of its kind and it is seeking an unmistakable entry into the Guinness Book of World Records for being the most unique and expensive saree.

The exceptionally stunning saree is meticulously woven with 12 precious stones and metals to depict 11 of Raja Ravi Verma’s popular paintings. Explicitly projected is ‘Lady Musicians’, one of the painter’s very famous works that displays women belonging to diverse cultural backgrounds.

Besides, the border of the saree pictures 10 other paintings of the artist that pays tribute to 20th century artist.
The best part of the saree being that the women in the paintings are intricately hand-woven and beautified with jewels of gold, diamond, platinum, silver, ruby, emerald, yellow sapphire, sapphire, cat’s eye, topaz, pearl and corals.

Already in the Limca Book of Records, this 40 lakh saree will be the first silk saree that required the use of 7,440 jacquard hooks and 66,794 cards during the weaving process. Moreover, a group of consummate workers took nearly 4,680 hours

(जालावरुन सभार)

13 April 2009

को़कीळ

माझ्या घराच्या समोर असलेल्या जांभळाच्या झाडावर गायन करणारे को़कीळ टिपले आहेत्,पहा तर हे गायक दिसतात तरी कसे?

DSCN1286

DSCN1291

DSCN1294

DSCN1295

DSCN1297

11 April 2009

अffair

हा संवाद आहे एकाच कॉलनीत राहणार्‍या एकाच वयोगटातील मुलांचा,,,कॉलनीत त्यांच्याच मित्रांच्या भानगडी त्यांना बरोबर ठाऊक असतात,,ह्या ग्रुप मधील काही मुलं अगदी सरळ मार्गी असतात..घरातले संस्कार,,आई-वडिलांचा आदर युक्त धाक यामुळे ही मुलं लफडी करण्यापासून दूरच असतात...पण त्यांच्याच ग्रुप मधल्या इतर मुलांची प्रकरणे पाहून त्यांना कुठेतरी मनात वाटत असते की त्यांना का असं काही करता येत नाही,,का त्यांच्यात तो दम नाही की धमक !!!त्यांना हे माहीत असते की भानगडी करणे गैर आहे पण जो तो तेच करताना दिसतो आणि ते फक्त बघ्याचीच भूमिका घेऊ शकतात ही भावना त्यांचा मनात बर्‍याच वेळा येते.....)::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::मंदार :-- काय रे काय नवीन खबरबात ?

दिघ्या :-- आधी मला सांग आहेस तरी कुठे तू??दिसतच नाहीस हल्ली !!!

मंदार :-- अरे मी इथेच आहे पण हल्ली कामामुळे जास्त खाली कट्ट्यावर येता येत नाही..माझं सोड तू नवीन न्यूज काय आहे ते सांग.

दिघ्या :-- अरे हल्लीच नवीन इस्टोरी कळली आहे..अरे ती ६व्या मजल्यावर राहते ना...लांब केस असलेली..ती ती गोरी आंटी रे !!!

मंदार :-- कोण रे ?

दिघ्या :-- अरे जी भाड्याने राहत नाही का !!

मंदार :-- तिच काय ??

दिघ्या :-- अरे रिच्चड (रिचर्ड चा असाच उच्चार करतात !!) ने मजबूत घेतली तिला !!!!!!

मंदार :-- काय बोलतोस्स्स...तुला कसं कळलं?

दिघ्या :-- अरे त्या दिवशी आम्ही दोघे म्हणजे मी आणि रिच्चड बसलो होतो त्याच्याच घरी दोन घोट घेत..तेव्हाच तो मला म्हणाला..

मंदार :-- काय ?

दिघ्या :-- अरे जाम कंटाळला होता,,बोटीवर होता ना इतके दिवस...६ महिन्यांनी आला होता परत,,,

मंदार :-- मग !!!

दिघ्या :-- संत्या बघ ह्याला लयं इंटरेस्ट दिसतोय !!!

संत्या :-- खी खी खी.....

मंदार :-- अरे साल्यांनो ही असल्या लफड्यांची माहिती तुम्हालाच जास्त असते ना..ह्या ह्या ह्या...

तु साला स्टोरी कंटिन्यू कर..लिंक तुटायची नाहीतर !!!

दिघ्या :-- कुठे होतो तर मी ?

संत्या :-- तू नाय तो रिच्चड असतो बोटीवर !!!

दिघ्या :-- हा... ३,४ पॅग झाले असतील आणि हा भाई रंगात आला!!बोलला ती समोर आली आहे ना राहायला तिला मी हल्लीच जाम रेमटवला !!!

संत्या :-- काय !! असं बोलला तो !!!!

दिघ्या :-- म्हणाला मस्त सोय झाली आहे!!! तिचा नवरा बाहेर गेला की हा शिरतो आत!!!!!!!

मंदार :-- हा रिच्चड साला एक नंबरचा निच्चड आहे...

संत्या :-- काय रे तुझी कशाला जळते ?

मंदार :-- मी कशाला जळतोय,,,च्यामारी पण नसीब वाला आहे !! ६ महिने बोटीवर असतो पण साला परत इथं आला की त्याच असं श्रमपरिहाराच सत्रच सुरू होत!!! मागच्या वेळी आला होता तेव्हा कोणतीतरी मद्रासण गटकवली होती यान !!

दिघ्या :-- साला हेच काय मला कळत नाय,, आपल्या नशिबात काय फक्त नेत्रसुखच ठेवलं आहे काय ??

संत्या :-- अरे असली लफडी करायला गट्स लागतात !

दिघ्या :-- कसले घंट्याचे गट्स??

मंदार :-- अरे तो बरोबर बोलतोय,,बघ तो राज्..अरे कामवाल्या बाईच्या चप्पला पण खाल्ल्या त्याने...आहे का तुझी अशी तयारी?आणि हे असे उध्योग करणार्‍या मुलालाच इंदू सारखी मुलगी गटवता आली ना ?

संत्या :-- इंदू ?

मंदार :-- अरे ती नाही का जिचा बाप इन्कमटॅक्स मध्ये मोठ्या पोस्टवर आहे...

संत्या :-- हा्.हा.हा आठवलं !! अरे पण आता ती इथे राहत नाही.

दिघ्या :-- अरे ती केव्हाचीच निघून गेली कॉलनी सोडून.

मंदार :-- एकदम रावस माल होता !! काय समजत नाही मला..इतका चांगला माल त्या माकडाच्या हाती लागला तरी कसा !!!!! माझ्या मनात एकदा विचार आला होता..

दिध्या :-- काय ?

संत्या :-- काय रे ??

मंदार :-- अरे तसे नाही रे....मी त्या राज ला विचारणार होतो की काय रे बाबा अंगाला काय लोहचुंबक लावून फिरतोस की काय??? बघावं तेव्हा याला नवीन नवीन पोरी चिकटलेल्या असतात !!!

संत्या :-- अरे तुला सुद्धा मुली चिकटतील..पण त्यासाठी काही कॉलिटीज तुला डेव्हलप कराव्या लागतील...

मंदार :-- कॉलिटीज आणि त्या माकडाकडे होत्या ??

संत्या :-- हो.सर्वात मोठी कॉलिटी म्हणजे तुला एकदम बोलबच्चन व्ह्यायला हवं.

दिघ्या :-- म्हणजे नक्की काय करायचं ?

संत्या :-- अरे मोठे मोठे राग ध्यायचे पोरींना..एकदम ढाचे ध्यायचे !!..पोरींशी अगदी गुलुगुलू बोलायचं...अरे बोलण्यातून अर्ध काम फत्ते होत.

मंदार :-- हा..पॉंईंट दिसतोय याच्या बोलण्यात. मी पण जेव्हढी पोरी कटवणारी पोर पाहिली आहेत ती सर्व एकदम बोलबच्चनच असतात..एकसे एक ढाचे किंग.काय मोहिनी मारतात कळत नाही आणि असं काय रे बोलतात ते नक्की?

दिघ्या :-- हा संशोधनाचा विषय आहे खरा !!

मंदार :-- संत्या तू पुढे बोल..

संत्या :-- हा तर..एकदम रावडी दिसायचं..एकदम झगरमगर कपडे घालायचे..अरे पोरींच लयं लक्ष असतं पोरांकडे..तो दिसतो कसा..बोलतो कसा याच्यातच त्यांना लयं इंटरेस्ट असतो ना !!मग एकदा का बोलणं सुरू झाल..की मग कधी मॅकडॉनल्स्,,एखादा पिक्चर...किंवा उपवनला न्ह्यायच फिरवायला.

दिघ्या :-- अरे त्या सोनालीला तर मी उपवनलाच पाहिलं होत एका मुलाबरोबर...

दिघ्या :-- हा.हा.हा...अरे इथे सभ्य दिसणार्‍या मुली तिथेच खर्‍या रूपात दिसतात ना !!! तर अशा प्रकारच्या तोडग्यांनी ही राज सारखी पोर आयटम पटवतात...आणि नंतर....खर्च केलेला सर्व पैसा बरोबर वसूल करतात.

मंदार :-- आणि आपण असेच दुसर्‍यांना पाखरं टिपताना बघत बसणार!!! ह्या गोष्टीचा प्रयत्न सोड पण त्याचा विचार सुद्धा करू शकणार नाही आपण.

संत्या :-- ह्म्म...

मंदार :-- तो रम्या नाही का,,,त्या दिवशी रात्री बियर प्यायला आणि आला घरी...बार मध्ये मित्रांबरोबर मस्ती करताना थोडी बियर सांडली शर्टावर... हा भाई घरी आल्यानंतर बाथरुम मधे गेला आणि शर्ट काढून लागला धुवायला...का तर कपड्यांना वास आला तर घरी कळेल म्हणून..

दिघ्या :-- मग ?

मंदार :-- अरे पोरगा इतका रातच्याला बाथरुममध्ये काय धुणं धुतोय हे बघायला त्याचे वडील उठले...त्यांना कळले की हा तर्राट्ट होऊन आलाय !!! मग असा काय धुतला त्याला की आता चुकून सुद्धा स्वतःचा शर्ट कधी धुणार नाही तो !!!!...

संत्या :-- ह्या.ह्या.ह्या....मायचं खुळं हाय तिझ्यायला....अरे पण तुला कसं कळलं?

मंदार :-- अरे माझ्या खालच्याच माळ्यावर राहतो ना तो...त्याचा पंचमात लागलेला सुर मी ऐकला ना !!

दिघ्या :--ही.ही.ही...ही.ही.ही.

मंदार :-- दुसर्‍या दिवशी मी विचारले..बाबारे काय झालं कालच्याला? तर म्हणाला :-- अरे कपडे वाळत घालण्याच्या काठीनेच त्याला बापाने धुऊन काढला !! आता मला सांगा जर बियर प्यायल्यामुळे त्याला इतका धुतला तर त्याच एखादं लफडं आहे असं जर त्याच्या बापाला कळलं तर काय होईल ???

तसंच आपलं पण आहे...माझ्ह्या घरच्यांना समजलं ही मी असले काही धंदे करतोय तर वडील खुंदळुन खुंदळुन काढतील मला...

संत्या :-- सेम,,माझा बाप तर हाकलून लावेल...

दिघ्या :-- माझी पण तीच स्थिती होईल....

मंदार :-- दुसर्‍याने गेम केला तरी

सगळं कसं फेयर असतं..

आणि आपण प्रेम केलं तरी

ते मात्र अffair का असतं?

मदनबाण.....

माझे डेन्मार्क चे रम्य दिवस. भाग ५

ख्रिसमस ची तयारी सगळीकडे दिसून येत होती..आम्हाला सुद्धा काही दिवस सुट्टी मिळाली होती त्यामुळे टिव्होली गार्डन पाहण्याचे आम्ही ठरवले.
पहिल्यांदी आम्ही कोपनहेगन या शहरी भागात आलो,,फक्त इथेच आम्हाला इमारतींना कलर दिलेला दिसला बाकी सर्व डेन्मार्क मध्ये आम्ही पाहिलेल्या इमारतींना कलर दिलेला पाहिला मिळालाच नव्हता..
DSCN0054
कोपनहेगन शहराचा भाग.
इथे जवळच आम्हाला सर्कस साठी जागा कायमची राखून ठेवल्याचेही दिसून आले.
DSCN0049
सर्कस साठी कायम स्वरुपी जागा.
आम्ही त्यावेळी वेळेच्या अभावामुळे सर्कस चा खेळ पाहू शकलो नाही. :(
मग आम्ही टिव्होली गार्डनच्या शोधात निघालो..आणि शेवटी एकदाचे टिव्होली गार्डन सापडलेच !!!
DSCN0045
टिव्होली गार्डन
लिंक :-- http://en.wikipedia.org/wiki/Tivoli_Gardens

ज्या वेळी आम्ही या गार्डनच्या जवळ पोहचलो त्यावेळी ते बंद होते म्हणून मग आम्ही संध्याकाळी परत या गार्डनला भेट ध्यावी असे ठरवले.
संध्याकाळी आलो व तिकीट काढून आत गेलो..हे गार्डन फारच सुरेख आहे.
आम्हाला हिमगौरी आणि सात बुटके यांचा लावलेला सेट पाहावयास मिळाला..
DSCN0115
हा सेट फारच सुरेख होता..
DSCN0116
बुटका आणि त्याचे घर..
DSCN0115
ह्यांना सुद्धा स्केटिंग करायला फार आवडत.. :)
सगळीकडे मस्त रोषणाई करण्यात आली होती.
DSCN0097
झाडे तर दिव्यांच्या प्रकाशात फारच सुंदर दिसत होती.
DSCN0085
आम्ही मस्त पैकी फिरलो ...गार्डन आकारानं तसे बरेच मोठे होते...
आता आम्ही वाट पाहत होते बर्फ कधी पडते याची...तापमान बर्‍याच प्रमाणात खाली आले होते..अजून पर्यंत मी हिम वर्षाव कधीच पाहिला नव्हता..आणि तो पाहण्याची फारच इच्छा होती... आणि हिम वर्षाव सुरू झाला...
DSCN0150
माझ्या हॉटेल च्या खिडकीतून टिपलेला हिम वर्षाव..
सगळीकडे जोरदार बर्फ पडत होते...आता तापमान-१५ च्या आसपास पोहचले होते.
DSCN0222
बर्फच बर्फ सगळीकडे !!!

जे काही शिकायचे होते आणि अनुभवायचे होते ते ते आम्ही केले, आमच्या प्रोजेक्ट चे ही काम संपले आणि आम्ही हिंदुस्थानात परत येण्यासाठी सज्ज झालो...या डेन्मार्क च्या रम्य आठवणी मी माझ्या मनात साठवून ठेवल्या...

(समाप्त)

मदनबाण.....

माझे डेन्मार्क चे रम्य दिवस. भाग ४

डेन्मार्क मध्ये मला प्रचंड शांतता भासत होती.इथे प्रदूषण अजिबात जाणवत नाही..गाड्यांच्या हॉर्नचा सुद्धा त्रास नाही..सगळं कसं एकदम शांत!!!
आमचे ऑफिस मध्ये काम सुरू झाले होते व शिफ्ट मध्ये काम करण्यास सुरुवात झाली होती त्यामुळे एक जण जर शिफ्ट मध्ये असेल तर दुसरा हॉटेलच्या रूम वर एकटा...
एकटेपणा हा जाम त्रासदायक अनुभव शिवाय आमचे खाण्या पिण्याचे सुद्धा जाम वांधे झाले होते कारण आम्ही दोघे शाकाहारी होतो त्यामुळे वरण भात आणि ऍपल ज्यूस यावर दिवस कंठत होतो.
मग ठरवले इथे कुठले भारतीय रेस्टॉरंट आहे का ते शोधावे किंवा एखादे दुकान ज्यात आम्हाला भारतीय खाद्यपदार्थ पदार्थ मिळतील!! आमच्या हॉटेलच्या जवळच नेट्टो नावाचे दुकान होते..ही नेट्टोची दुकाने पूर्णं डेन्मार्क मध्ये आहेत..त्या दुकान गेल्यावर मला पहिला भारतीय भेटला त्याचे नाव होते शर्मा.
त्याच्याशी अगदी मनमोकळ्या गप्पा मारल्या..तो म्हणाला नोकरीच्या शोधार्थ इथं आला आणि इथलाच झाला..त्यालाही माझ्याशी बोलून बरे वाटले मग मी त्याला विचारले इथे भारतीय खाद्यपदार्थ कुठे मिळतील त्यावर तो मला म्हणाला समोसा खाना पसंद करोगे क्या ??
त्यावर मी त्याला म्हणालो, क्या ?समोसा यहा मिल सकता है ?त्यावर तो म्हणाला हा !
त्याने मला एक पत्ता दिला व तो म्हणाला या पत्त्यावर जा तिथे दादरा नावाचे एक दुकान आहे व एक सरदारजी ते दुकान चालवतो तिथे तुला समोसा खायला मिळेल....
आम्ही फार खूश झालो आणि ते दुकान आम्ही शोधून काढले,,,गरम गरम समोसा खाल्ला व्वा !! भारता बाहेर सुद्धा आम्हाला हा भारतीय पदार्थ खायला मिळाला याचा आम्हाला प्रचंड आनंद झाला होता मग त्या सरदारजीच्या दुकानात आम्हाला पराठे, नान इ. पदार्थ मिळतात हे कळले आता आम्ही वरण भात सोडून दुसरे काही पदार्थ खाऊ शकणार होतो.
त्या दुकाना जवळ अनेक दुकाने होती व त्यावर मोमेडीयन नावे होती..सगळी दुकाने पाकिस्तानी लोकांची होती...इथे डेन्मार्क मध्ये पाकिस्तानी लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे !! आम्हाला हे पाकिस्तानी लोक बर्‍याच वेळी ट्रेन मध्ये भेटत व आम्ही दोघे हिंदी मध्ये बोलताना त्यांनी ऐकले की आमच्याशी बोलायला येत...आप हिंदूस्थानसे आये हो क्या? वहा पर बॉलिवुड मै अब सुपर स्टार कौन है ? असे अनेक प्रश्न ते आम्हाला विचारीत...कधीही आम्हाला असे जाणवले नाही की ते पाकिस्तानी आहेत...पाकिस्तानी लोकांना हिंदुस्थानी लोकाबद्दल भयंकर आकर्षण आहे हे आम्हाला तिथे जाणवले!!
आमचा प्रवास जसा बसने व ट्रेन ने सुरू होता तसाच तो आता टॅक्सी ने सुद्धा सुरू झाला होता कारण ज्या वेळी आम्ही नाइट शिफ्ट करायचो त्यावेळी बस नसायची त्यामुळे टॅक्सीने प्रवास करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता!!
इथली टॅक्सी म्हणजे मर्सिडिज !!!
DSCN0040
टॅक्सी स्टॅड.
मर्सिडिज ने प्रवास करताना जाम धमाल येई,,गाडी २००किमी प्रति तास धावतेय यावर कधी विश्वासच बसत नसे...इथले रस्ते अत्यंत सुंदर आहेत व प्रत्येक जण लेनची शिस्त पाळतो.
आम्हाला आमच्या ऑफिस कडुन चेक बुक सारखेच दिसणारी काही बंडल्स मिळाली होती..टॅक्सीतून प्रवास केल्यावर त्या चेक वर आपण कुठून प्रवास चालू केला व कुठे संपला ते लिहायचे व स्वतः :ची सही करून तो चेक ड्रायव्हरला द्यायचा. त्या चेकचे पैसे घेण्याचे काम टॅक्सी ड्रायव्हरचे !!!
ख्रिसमस चे दिवस जवळ येत होते त्यामुळे आम्ही थोडंसं शॉपिंग करायचे ठरवले व एका अवाढव्य मॉलचा आम्ही पत्ता शोधून काढला..त्या मॉलचे नाव होते फील्ड्स.
DSCN0130
या मॉलमधे ही ख्रिसमसचेच वातावरण होते..सगळीकडे ख्रिसमस ची सजावट करण्यात आली होती..
इथे जवळ जवळ प्रत्येक वस्तू मिळत होती व त्यावर थोड्या फार प्रमाणात सूट देखील होती.माझा कॅमेरा मी याच मॉल मध्ये विकत घेतला.
आम्ही आता डेन्मार्क चे बरेच भाग फिरत होतो व असेच एक दिवस फिरता फिरता आम्हाला मोठं चर्च दिसले.
DSCN0062
माझ्या ऑफिस कडे जाताना सुद्धा अगदी सुंदर वाटायचे,,,बस मधून दिसणारी एक गूढ बिल्डिंग,,शेत..सारेच काही मनोरम वाटे.
Mis Building
एक गूढ बिल्डिंग..याचा आकारच काही वेगळा आहे.


शेत १

DSCN0144
शेत २
DSCN0143

एकटेपणे जगण्याची सवयच होत चालली होती.आई वडिलापासून कधीच मी एकटा राहिलो नव्हतो त्यामुळे एकटेपणा कशाशी खातात हे माहीतच नव्हते एक वेगळेच जिणे जगत होतो...भारतात खाध्य संस्कृती आहे असे म्हणतात ते का हे ही चांगलेच समजले होते!!!आईच्या हातचे पोहे आणि उपमा खायला टाळाटाळ करायचो आणि आता मात्र ७ क्रोनला मिळणार्‍या समोस्यावरच आनंद मानावा लागत होता....असो आता आम्ही टिव्होली गार्डनला भेट ध्यायची असे ठरवले.

क्रमशः
मदनबाण.....

माझे डेन्मार्क चे रम्य दिवस. भाग ३

माझ्या सहकार्‍याला म्हणालो अरे रोज प्रवास करतो तेव्हा असे जाणवत नाही आपण चुकीच्या दिशेने जात आहोत!!!आता जे पहिले स्टेशन येईल तिथे आपण उतरूया...आम्ही समुद्र ओलांडून स्वीडन या नवीन देशात पोहचलो होतो !!!आणि ट्रेन स्टेशनावर थांबली ...समोर टिसी.

-------------------------------------------------------------------------------------------
समोर टिसी उभा झाल्यावर आमच्या दोघांची फाफलली...शिवाय जरी आम्ही शेंगन व्हिसावर वर आलो असलो तरी त्यावेळी आम्हा दोघांकडे पासपोर्ट नव्हता!!!
टिसी जवळ आला व त्याने आम्हाला आमचा पास विचारला,,आम्ही सरळ त्याला आमचा पास दिला व सांगितले की आम्ही डेन्मार्क मध्ये नवीन आहोत व आम्ही चुकीची ट्रेन धरून आलो आहोत व आम्हाला ही ट्रेन स्वीडनला जाते हे माहीत नव्हते!!
त्यावर तो म्हणाला ओके नो प्रॉब्लेम गो टू दॅड साइड.. त्याने आम्हाला बोटोच्या खुणेने दुसर्‍या फलाटावर जाऊन परत डेन्मार्क ला जाणारी ट्रेन धरा असा गोड सल्ला दिला व स्वतः शिटी वाजवत त्या ट्रेन मधून निघून सुद्धा गेला!!
आम्ही तर फुल टू टेन्शन मध्ये होतो वाटलं होत आता रात्र जेल मधेच काढावी लागणार कारण आमच्या कडे पासपोर्ट सुद्धा नव्हता!!पण हा तर देव माणूस निघाला,,,नाहीतर आपल्या इथं साले सतत सावज शोधत असतात...
आता आम्ही शहाणे झालो होतो त्यामुळे पुन्हा अशी भानगड होणारच नाही याची आम्ही काळजी घ्यायची ठरवली.
डेनमार्क मधील बसेसची सोय खूपच छान आहेत.आम्ही कोकाडेलला उतरलो की समोरच बस स्टॅड होता.
या स्टॅड वर फलाफल हा जरा चवीने विचित्र लागणारा पदार्थ मिळतो मी फक्त एकदाच व्हेज फलाफल खाल्ले त्यानंतर कधीच नाही!!
DSCN0281
कोकाडेल रेल्वे स्टेशन.

DSCN0286
कोकाडेल बस स्टॅड.
या बसला तीन दरवाजे असतात,,पहिल्या दरवाज्यातून आत चढायचे व ड्रायव्हरला पास दाखवायचा तो टाक म्हणाला की आपण आत जायचे.दुसरा दरवाजा मधून गर्भवती स्त्रिया,बाळासकट असलेली बाबागाडी,सायकलवाले यांच्या चढण्यासाठी प्रामुख्याने वापरला जातो.तिसरा दरवाजा हा फक्त आणि फक्त उतरण्यासाठी वापरला जातो.प्रत्येक दरवाज्यावर एक व्हिडिओ कॅमेरा लावलेला असतो त्यामुळे ड्रायव्हरला आतील सर्व काही त्याच्या समोर लावलेल्या मॉनिटरवर दिसते.बसच्या आत एक इंडिकेटर ही असतो जो पुढचा येणारा बस स्टॉप कुठला ते दर्शवतो. ही बस उंचीने खाली वर करता येते त्यामुळे वृद्ध लोकांना आरामात चढता येते.
इथे थंडी जोरदार असल्यामुळे बस आतून गरम ठेवण्यासाठी हीटरचा उपयोग केला जातो.
DSCN0019
बस आतून अशी दिसते.
या फोटोमध्ये तुम्हाला दिसेल की प्रत्येक सिटवर असलेल्या रॉड वर एक लाल बटण आहे ते बटण दाबले की ड्रायव्हरच्या समोर एक दिवा लागतो व त्याला कळते की येणार्‍या स्टॉपवर बस थांबवायची आहे,,आम्हाला पहिले तर समजतच नव्हते की ही बस थांबवाची कशी कारण आपल्याला तर सवय आहे बोंबलायची ओ मास्तर बेल मारा,पण इथे कुठला आलाय फिरंगी मास्तर...पण हळू हळू बस आपल्याच स्टॉपला कशी थांबवायची ही अक्कल आली.
डेन्मार्क चे लोक व्यायाम करून फिट राहण्यात पटाईत आहेत..आम्हाला ते सतत जॉगिंग करताना दिसत मग ते सकाळी असो दुपारी असो वा रात्री!!जो तो आपला एक छोटासा टॉवेल गळ्यात घालून पळतोय...विशेषतः हे लोक सायकल आवडीने चालवतात..(इतक्या थंडीत कसे चालवतात हे त्यांनाच ठाऊक) सायकल साठी रस्त्यावर वेगळी लेन असते व लेनचा वापर कटाक्षाने केला जातो.हे लोक बर्‍याच वेळी तळ्याकाठी फिरायला येतात...
मग मी पण एक दिवस तळ्याकाठी फिरायचे ठरवले.

या तळ्यात इतकी सुंदर हंस होते की त्यांचे फोटो काढायचा मोह मला टाळता आला नाही!!!
DSCN0257
तलाव १

DSCN0259
तलाव २

DSCN0260
तलाव ३
एकूण ३ तलाव आहेत व थंडीत ते गोठतात व त्यावर लोक स्केटिंग करतात असे आम्ही ऐकले होते.
हे लोक इतके फिटनेस फ्रीक आहेत हे पाहून आम्हाला नवलच वाटले.
इथल्या तरुण मुलांना रॉक म्युझिक,ग्रॉफिटी आणि च्युईंगगम चावायला फार आवडते.
तर म्हातार्‍या माणसांची संख्या पण भरपूर आहे इतकी की मजेत मी माझ्या मित्राला म्हणायचो की हे लोक इतके फिट राहतात की साला सेंच्युरी मारल्या शिवाय कोणीच आऊट होत नसेल. :)

क्रमशः

मदनबाण.....

माझे डेन्मार्क चे रम्य दिवस. भाग २

आता कुठे जरा रस्ते कळायला लागले होते...माझ्या हॉटेल पासून आमच्या क्लायंट चे ऑफिस बरेच लांब होते.मी नोरेपोर्ट च्या भागात राहत होतो तिथून ७ स्टॉप बसने गेल्यावर नोरेपोर्ट स्टेशन येते मग तिथून ट्रेन धरायची...जवळ जवळ पाऊण तास ट्रेन ने प्रवास केल्यावर कोकाडेल नावाचे रेल्वे स्टेशनला यायचे तिथून एक बस धरायची व ४ स्टॉप आल्यावर उतरून दुसरी बस धरायची जी माझ्या ऑफिस ला जायची..असा हा बराच उध्योग करावा लागे फक्त ऑफिसला पोहचण्यासाठी!!!
एअर पोर्ट ला पोहचल्या वर आम्हाला जो ट्रेन पास दिला होता तो पास बस मध्ये देखील चालत असे...डेन्मार्क हा देश आकाराने खूप लहान आहे व इथली लोक संख्या देखील फार कमी आहे..त्यामुळे त्या लोकांनी संपूर्ण देशाला झोन मध्ये विभाजित केले आहे..प्रत्येक झोन मध्ये प्रवास करण्यासाठी वेगळे तिकीट काढावे लागते.आम्ही इथे नवीन असल्यामुळे आम्हाला हा झोन प्रकार कळेना व उगाच पकडले जाऊ नये म्हणून आम्ही ऑल झोनल पास काढून ठेवला..तो पास पूर्णं देशात चालायचा त्या मुळे रेल्वे ने प्रवास असो वा बसने तो पास सर्वत्र चालायचा.
Norreport Station Entrance
प्रत्येक भूमिगत मेट्रो स्टेशन च्या वरती 'एस'चा लोगो असतो..आणि समोर जे विहिरी सारखा भाग आहे तो म्हणजे जमिनी खाली शुद्ध हवेचा पुरवणारे पंखे आहेत जे बाहेरची हवा खालच्या स्टेशनात पुरवतात..
ग्रॅफिटी(Graffiti) इथं जोरदार चालते हे फोटो वरुन कळेलच..
इथे बर्‍याच वेगवेगळ्या ट्रेन्स आहेत...त्यांची आसन व्यवस्था पण वेगवेगळ्या प्रकारची आहे..
पहिला प्रकारा मेट्रो जी एक माळा वरती पण जाते आणि तीन माळे खाली सुद्धा...
DSCN0240
तीन माळे खाली जाण्याचा रेल्वेचा मार्गः
View Of Railway Track From Orestad Station
हे एक माळा वर असलेले स्टेशन...
DSCN0135
हे सगळे लोक आत मेट्रो मध्ये चढत आहेत...
या ट्रेनची खरी गंमत अशी आहे की याला चालक नसतो !!! होय ही पुर्णपणे संगणकाने नियंत्रित केलेली असते...
DSCN0136
जरा जवळून पाहायचय ???
DSCN0137
हे मुंबईत डबल डेकर बस ने वरच्या टपावर अगदी पहिल्या खिडकीतून पाहिल्यास जसे वाटते तसेच या ट्रेन मध्ये वाटते.
ट्रेन मध्ये टिसी येतात त्यांना आपला तो पास दाखवायचा की मग ते म्हणतात 'टाक'('Tak') म्हणजे धन्यवाद!!! :)
इथली भाषा डॅनिश..च्यामारी इथं साला सगळंच उलट!! ए ला ओ म्हणतात आय ला इ म्हणतात जे ला वाय म्हणतात..म्हणजे JAN याचा उच्चार यान.हे ऑफिस मध्ये मला जास्त शिकता आलं.
बाय बाय ला हे लोक हाय हाय म्हणतात...आता बोला !!!
आता आम्ही ऑफिस ला कसे पोहचायचे हे व्यवस्थित शिकलो...बसची वेळ लक्षात ठेवली की बरंच काम सोपं होत कारण इथे बस उशीरा येत नाहीत(९५%वेळा तरी).बर्‍याच बस स्टॉप वर डिजीटल इंडिकेटर बसवलेला असतो..५-४-३-२-१-० झाले की बस समोर!!!सगळं साला वाय फाय आहे.
आम्हाला वाटत होते की आता ट्रेनचा प्रवास आम्हाला समजला पण ते खरं नव्हतं,,,कारण एक दिवस
आम्ही घरी जाण्यासाठी ट्रेन ने निघालो आणि कुठल्या भलत्याच स्टेशन ला उतरलो कारण ही उलटी सुलटी स्टेशन ची नावे लक्षात ठेवण्यात आमची चूक झाली होती!!!त्याचा झालेला परिणाम जबरदस्त होणार होता...
आम्ही स्टेशनवर तर उभे होतो पण नक्की कुठल्या दिशेला जायची ट्रेन धरायची हेच समजत नव्हते!!
शेवटी एक ट्रेन धरली आम्ही..मी माझ्या सहकार्‍याला सांगितले की आपण चुकीची ट्रेन धरली आहे पण तो मानायला तयार नव्हता...थोड्या वेळाने मला असे जाणवली की ट्रेन कुठल्या तरी पुलावरून जात आहे व खाली समुद्र आहे!! बाहेर मिट्ट काळोख असल्या मुळे काहीच कळत नव्हते !! माझ्या सहकार्‍याला म्हणालो अरे रोज प्रवास करतो तेव्हा असे जाणवत नाही आपण चुकीच्या दिशेने जात आहोत!!!आता जे पहिले स्टेशन येईल तिथे आपण उतरूया...आम्ही समुद्र ओलांडून स्वीडन या नवीन देशात पोहचलो होतो !!!आणि ट्रेन स्टेशनावर थांबली ...समोर टिसी.

क्रमशः

मदनबाण.....

माझे डेन्मार्क चे रम्य दिवस. भाग १

ए चलतोस का पासपोर्ट काढायला ?मित्राने प्रश्न विचारला...पासपोर्ट मला कशाला लागणार आहे ?माझ्या मनात विचार आला !!
पण बाकीचा ग्रुप चालला आहे म्हणून मी पण त्यांच्या बरोबर पासपोर्ट काढायला गेलो...फॉर्म भरला...काही दिवसात पोलिस स्टेशन मधून फोन आला..पहिल्यांदा फोन आला तेव्हा मीच घेतला जरा टेन्शन आले पोलिसांनी कशासाठी फोन केला असेल पण नंतर लक्षात आले की पासपोर्ट रिलेटेड चौकशी करण्यासाठी पोलिस स्टेशनला बोलवले आहे....
चौकशी झाली आणि काही दिवसातच पासपोर्ट घरी आला...मग अनेक वर्ष तो तसाच कपाटात पडून होता...कधी त्या पासपोर्ट ला मी बाहेर काढून बघत असे आणि मनात विचार करी की याचा वापर कधी तरी होईल का??पण ती वेळ येणारच होती.
माझं क्षेत्र बदलून मी आयटी मध्ये आलो.आयडीबीआय,रिलायन्स इन्फोकॉम इ. कंपन्या बदलत बदलत आत्ताच्या कंपनीत आलो.
दिवस जात होते आणि वेळही...एक दिवस अचानक माझ्या शेजारी बसणार्‍या एका बाईने मला विचारले की तू इंटरव्ह्यू दिलास का ?
मी विचारले इंटरव्ह्यू कसला इंटरव्ह्यू ??
ती मला म्हणाली अरे डेन्मार्क च्या प्रोजेक्ट साठी इंटरव्ह्यू चालू आहेत...मला या विषयी काहीच माहीत नव्हते!!माझ्या ग्रुप मधील एक मुलगा या प्रजेक्ट साठी सिलेक्ट झाला होता आणि त्या बद्दल मी त्याचे अभिनंदनही केले होते पण अजून सिलेक्शन प्रोसेस चालू आहे हे बहुधा त्याला माहीत नसावे...
मी चौकशी करायची ठरवले...पहिल्या राउंडाचा इंटरव्हु कोण घेतंय ते मला शेवटी समजलेच...मी त्यांना भेटलो...त्यांनी माझा मेल आयडी विचारला व सांगितले की मी तुला सिव्ही चा एक फ़ॉरमॅट पाठवतो तू त्या फॉरमॅट मध्ये तुझा सिव्ही पाठव..
मी तसेच केले सिव्ही पाठवला..माझा पहिला इंटरव्ह्यू त्यांनीच घेतला... या गोष्टी घडून ४ एक दिवस झाले...पण पुढचं काही समजेनाच...
परत ज्यांनी माझा इंटरव्ह्यू घेतला होतो त्यांना भेटायला गेलो तर ते प्रोजेक्ट साठी युरोपला निघून गेले होते..पण जाण्या आधी त्यांनी माझा सिव्ही ओके करून पुढे पाठवला होता...नंतर माझे इंटरव्हु च्या राउंडसं चालू झाल्या जवळपास ८ इंटरव्ह्यू झाले..आणि मी सिलेक्ट झालो...
डिसेंबर २००६ ला मी डेन्मार्क ला जाण्यासाठी सज्ज झालो.........ज्या मुलाला मी या प्रोजेक्ट मध्ये सिलेक्ट झाल्याबद्दल अभिनंदन केले होते त्याच्या आधी मी डेन्मार्क ला जाणार होतो व तो नंतर १५ दिवसांनी आम्हाला तिकडे भेटणार होता.
शेवटी तो दिवस आला...ऑस्ट्रियनं एयर लाइन्स चे फ्लाईट धरून मला व्हीयन्नाला उतरून दुसरे कनेक्टिंग फ्लाईट धरायचे होते.
चेक इन केले...सर्व गोष्टी माझ्यासाठी नवीन होत्या..इंडिकेटर वर फ्लाईट डिटेल्स पाहिल्या..विमान वेळेवरच होते,मी आणि माझा सहकारी फ्लाईटची वाट बघत बसलो....शेवटी एकदाचे विमानात शिरलो...आणि आमचा प्रवास सुरू झाला.
DSC00176
व्हीयन्नाला पोहचलो..दुसर्‍या फ्लाईटला अजून दीड तास होता,,आता इतका वेळ काय करायचे? मग अख्खा एयरपोर्ट फिरून घेतला.
दुसर्‍या फ्लाईट धरली..आणि सरते शेवटी डेन्मार्क ला लॅड झालो...कोपन हेगन एयरपोर्ट वर आमच्या कंपनीचा माणूस आला होता...कोपनहेगन ही डेन्मार्कची राजधानी आहे.
Copanhagan Airport (Kastrup)
(कोपन हेगन एयरपोर्ट)
त्याने लगेच आमचा ट्रेनचा पास काढला व मोबाईलचे सिम कार्ड आम्हाला दिले...
आयुष्यातल्या बर्‍याच गोष्टी मी प्रथमच पाहत होतो..सगळी कडे गोरे लोक दिसत होते,,,मला वाटले की माझं मोडकं तोडकं इंग्रजी
ह्या लोकांना कसे सम़जणार ?पण नंतर कळलं की या फिरंग्यांची भाषा डॅनिश आहे व त्यांनाच इंग्रजी थोडी फार येते त्यामुळे माझे टेन्शन बरेच कमी झाले !!
थोडी करन्सी कनव्हर्ट करून घेतली आणि आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो.डेन्मार्क चे चलन आहे क्रोन्स्.त्या वेळी १ क्रोन =७ भारतीय रुपये होते.शिवाय इथे युरो देखील चलनात होते त्यामुळे जास्त त्रास नव्हता.
शेवटी आमचे हॉटेल सापडले..डेन्मार्क ला कायदे फार कडक आहेत,,त्यामुळे एका रूम मध्ये तीन पेक्षा जास्त माणसे राहू शकत नाहीत.ज्या रूम वर पोहचलो तिथ आमच्याच कंपनीतला पण दुसर्‍या प्रोजेक्टवर काम करणारा आमच्याच वयामधील एक मुलगा राहत होता.रूम मस्त होती टीव्ही,म्युझिक प्लेयर आणि किचन मधील सर्व सामानासकट होती.फक्त कपडे धुण्यासाठी इमारतीच्या तळघरात एक वॉशिंग मशीन होते.
पहिले दोन दिवस जरा आरामातच गेले..आमच्या रूम वर जो मुलगा होता त्याला आम्ही खाण्या-पिण्याच्या वस्तू कुठे मिळतात व इथे प्रवास कसा करायचा हे जाणून घेतले. त्याला डेन्मार्क ला राहून जवळपास १ वर्ष झाले होते त्यामुळे त्याला इथली सर्व माहिती होती,मग आम्ही त्याच्या बरोबर डेन्मार्क फिरायचे ठरवले..इथे थंडी भयंकर असते -१५ पर्यंत तापमान खाली जाते.आम्ही डिसेंबर मध्ये आलो होतो आणि थोडेसे गरम कपडे सुद्धा घेतले होते पण ते इथे पुरणारे नव्हते..त्या मुळे मी इथेच एक विंटर जाकीट घ्यायचे ठरवले.

क्रमशः
मदनबाण.....

गूळाची गोडी.....

नुकतेच आम्ही (मी,आई व माझे वडील) कोल्हापूर ला गेलो होतो. तिथ माझ्या मामाचा बंगल्याचा मागे असलेल्या गुर्‍हाळाला भेट देऊन गुळाची निर्मिती प्रक्रिया बघितली.....


प्रथम "फडकरी हे शेतातून ऊस तोडून ट्रॅक्टर द्वारे गुर्‍हाळा पर्यंत घेऊन येतात.


त्या नंतर "घाणकरी" हे ऊस मोठ्या चरकात घालून त्याचा रस काढतात.हा रस खाली मोठ्या हौदात पडत असतो.रस पडत असताना त्यामधील घाणीचे विघटन होऊन ती बाहेर काढता यावी म्हणून एक पावडर घालतात.या नंतर तो रस दुसर्‍या टाकी मध्ये पंपा द्वारे नेऊन तिथून मग तो मोठ्या काहिली मध्ये सोडला जातो.
या ठिकाणी मोठी चूल केलेली असते.


तिच्या बाजूला चिमणी असते ज्या द्वारे धूर बाहेर सोडला जातो.या चिमणीच्या बाजूलाच आतामध्ये इंधन टाकण्यासाठी जागा असते.या प्रक्रिये मध्ये कामकरणार्‍या कामगारांना "चूलकरी" व चुली मध्ये इंधन टाकणार्‍या कामगाराला "चूलण्या" या नावानी संबोधतात.


या मध्ये लागणारे इंधन म्हणजे दुसरे तिसरे काही नसून चरकातून रस काढून राहिलेली चिपाडे असतात.ती सुकवून त्याची गंजी करून साठवण करून ठेवतात.व तिच सुकलेली चिपाडे नंतर इंधन म्हणून वापरतात.
आता काहिली मधील रस गरम केला जातो.


हा रस २ १/२ तास उकळत ठेवतात व उकळताना तो फसफसून बाहेर पडू नये म्हणून काहिली मध्ये एक चक्रा द्वारे रस सतत ढवळत ठेवतात.
हे काम करणार्‍या कामगाराला गुळण्या असे म्हणतात.
या नंतर उकळणार्‍या रसावर मळी जमा होऊ लागते,ती झार्‍याने बाहेर काढली जाते.त्या नंतर काकवी बनण्यास सुरू होते व त्याची पुढची पायरी म्हणजे गूळ तयार होणे.


काहिलीच्या जवळच एक मोकळा सिमेंटचा चौकोन असतो,तो प्लॅस्टिकच्या पेपरांनी झाकून ठेवलेला असतो त्यामुळे त्या मध्ये कुठलाही केर-कचरा पडत नाही.
रस जसा जसा तयार होऊ लागतो तेव्हा त्या मध्ये जर्मन जॉगरी पावडर घालतात.तसेच गुळाला रंग येण्या साठी त्या रसात खाण्याचा चुना व १ कप
शेंगदाणा तेल घातले जाते.(तसेच नुसता खाण्यासाठी करावयाच्या गुळात दूध पण घालतात.तसेच काही ठिकाणी रसातील घाण जमा करण्यासाठी काटे भेंडी च्या पाल्याची मोळी करून ऊसाच्या रसात गोल गोल फिरवतात.)
जसा जसा रस तयार होत जातो तसे "मांडकरी" चौकोन स्वच्छ करून त्या चौकोनात पाणी शिंपडून ठेवतात.व काही मांडकरी कामगार फडकी ओली करून प्लॅस्टिक च्या बादली मध्ये घालून ठेवतात.
आता तयार झालेल्या रसाच्या काहिलीला मांडवकरी व गुळण्या हे कामगार उचलून आणतात.काहील काहीशी तिरपी करतात व काहिली खाली असलेला व्हॉल्व उघडतात.आता भराभर रस चौकोनात पडावयास लागतो,,,,,शेवटी तो पुर्णपणे भरतो. आता तो रस मोठ्या कालथ्यांनी पसरवला जातो,,,,,त्या मुळे रस एकजीव व घट्ट होण्याची प्रक्रिया लवकर होते.


आता गुळाची शेवटची प्रक्रिया सुरू होते ती म्हणजे घट्ट झालेला गूळ मांडवकरी ओले फडक घातलेल्या बादल्या मध्ये घालतात.नंतर तो गूळ घट्ट झाल्यावर बादली उलटी करतात व आपल्याला १० किलो वजनाची ढेप मिळते.
२ टन कापलेल्या ऊसा पासून साधारण ४०० लीटर रस तयार होतो व त्याच्या २६ १/२ (प्रत्येकी १० किलो ची एक ढेप) ढेपा तयार झाल्या.


मदनबाण.....